Thursday, July 10, 2025

प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी भाजपचा अभिनव उपक्रम

प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी भाजपचा अभिनव उपक्रम

मुंबई (प्रतिनिधी) : अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सीईटी, नीट आणि जेईई सारख्या प्रवेश परीक्षांसाठी योग्य प्रकारे सराव व्हावा, या उद्देशाने भाजपच्या प्रदेश सचिव श्रीमती दिव्या ढोले यांनी मोफत ‘ऑनलाइन मॉक टेस्ट पेपर सिरीयल सेट’ हा उपक्रम सुरु केला आहे. या संदर्भातील संकेतस्थळाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले.


परीक्षा संपल्यानंतर या प्रवेश परीक्षांचा अभ्यास व सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अधिकाधिक प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत सोडविण्याचा सराव व्हावा, यासाठी या चाचण्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.


त्यासाठी विद्यार्थ्यांना www.divyadholay.com या पोर्टलवर नावनोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेनुसार प्रत्येक परीक्षेच्या ३० प्रश्नांची प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपक्रमाच्या संयोजिका व प्रदेश सचिव श्रीमती दिव्या ढोले यांनी केले आहे.

Comments
Add Comment