मुंबई : मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल २०२२ च्या उर्वरित सामन्यांत खेळताना दिसणार नाही. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्या दरम्यान यादवच्या डाव्या हाताला झालेल्या स्नायूच्या दुखापतीमुळे २०२२ च्या आयपीएल मधून बाहेर गेला आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटरवर याबाबतची माहिती मिळाली आहे.
NEWS – Suryakumar Yadav ruled out of TATA IPL 2022
More details here – https://t.co/1DchNAPSiY #TATAIPL pic.twitter.com/iVmLMBNNVz
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
यामुळे कोलकात्याविरोधात आज होणाऱ्या सामन्याआधी मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीला काही सामन्यांना सूर्यकुमार मुकला होता. आता दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवला आयपीएलला मुकावे लागले आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादवने मुंबईसाठी आठ सामने खेळले आहेत. ज्यात ४३.२९ च्या सरासरीने ३०३ धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवला दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सुरूवातीच्या तीन सामन्यांना मुकावे लागले होते.