नवी मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक शहराला सजेशा बसेसमध्ये बसेसची बांधणी करणाऱ्या कंपनीने स्टॉपची बटणे निर्माण केली. यामागे प्रचलित घंटीचा वापर करू नये. या प्रकरचा संकेत दिला गेला होता; परंतु बसेसमध्ये बसविण्यात आलेल्या बटणावर प्रवाशी विद्यार्थी व लहानग्यांनी त्याचा वापर मजेसाठी केल्यामुळे चालकाची डोकेदुखी वाढली. म्हणून यावर प्रतिबंध यावा म्हणून कार्यान्वित केलेली बटन सिस्टीम बंद करण्याची वेळ मनपा परिवहन उपक्रमावर आली आहे.
मनपाच्या परिवहन उपक्रमात पाचशेपेक्षा जास्त विविध प्रकारच्या बसेस आहेत; परंतु यातील नव्याने आलेल्या पर्यावरणपूरक वातानुकूलित बसेस व काही साध्या बसेसमध्ये घंटी विरहित बस सेवा मिळावी. म्हणून बसेसमध्ये असणाऱ्या लोखंडी रॉडवर स्टॉप नावाचे बटन लावून त्याद्वारे बसेसचे मार्गक्रमण चालावे हा उद्देश होता. पण त्याचा दुरुपयोग सुरू झाल्याने उपक्रमाला आधुनिक स्टॉप सिस्टीम बंद करण्याची परिस्थिती ओढवली आहे.
बस सेवा सुरू झाल्यावर यापूर्वी सुतळीचा वापर करून घंटी त्याला बांधली जात होती. त्याद्वारे एक घंटी वाजली की बस थांबविली जात असे. तर दोन घंटी वाजल्यावर बस पळवण्याचे संकेत होते. यामुळे वाहकाला सुतळीपर्यंत जावे लागत होते; परंतु नव्याने यंत्रणा वापरून स्टॉपचे बटन आगदी कंबरेच्या उंचीवर होते. तसेच बसेसमधील सर्वच प्रवाशांना आधारासाठी उभारलेल्या रॉड वर असल्याने वाहक सहज थांबा आल्यावर स्टॉपचे बटन दाबून बस थांबवून बस थांबवण्याचा इशारा चालकाला करत असे; परंतु विद्यार्थ्यांच्या मस्तीमुळे स्टॉपच्या बटणावर पाणी फेरले गेले आहे.
बसेसमध्ये स्टॉपचे बटन हाताशी असल्याने लहानग्यांना मजा येत असे. बटन दाबल्यावर टुकटुक आवाजाने विद्यार्थी आनंदित होत बटन दाबण्याचा सिलसिला नेहमीच चालला होता. त्यामुळे मनस्ताप होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
स्टॉपचे बटन का बंद केले आहे, याची माहिती घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल. – अनिल शिंदे, वाहतूक अधीक्षक, परिवहन उपक्रम.