Tuesday, June 17, 2025

प्रियेशा - श्रीकांत जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक

प्रियेशा - श्रीकांत जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक

ब्राझीलीया (वृत्तसंस्था) : ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या मूकबधिर ऑलिम्पिक स्पर्धेत प्रियेशा देशमुख आणि श्रीकांत धनुष या नेमबाज जोडीच्या कामगिरीने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. या स्पर्धेत भारताच्या प्रियेशा देशमुख आणि श्रीकांत धनुष या नेमबाज जोडीने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. १० मीटर्स एअर रायफल प्रकाराच्या मिश्र दुहेरीत प्रियेशा आणि श्रीकांत या जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली.


सध्या ब्राझीलमध्ये २४ वी मूकबधिर ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताला मोठे यश मिळाले आहे. प्रियेशा देशमुख आणि श्रीकांत धनुष या नेमबाज जोडीनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. दरम्यान, श्रीकांत धनुषने 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले होते. यासोबतच शौर्य सैनीनेही या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.


कर्णबधिर ऑलिम्पिकमध्ये एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत ८ खेळाडूंमध्ये अंतिम सामना झाला. यामध्ये धनुषने २४७.५ च्या विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकले होते. दक्षिण कोरियाच्या किम वांगने २४६.६ गुणांसह दुसरे, तर भारताच्या शौर्य सैनीने २२४.३ गुणांसह तिसरे स्थान पटकावले होते.

Comments
Add Comment