डॉ. विजया वाड
मालती माधवचा डबा भरत होती. साबूदाणा खिचडी, सायीचं दही नि उपासाचे तळकट वडे! माधव खूश! मालतीला ‘किती करतेस?’ हे दोन शब्द पुरेसे होते.
नवरे सुद्धा बायकोला खूप गृहीत धरतात. दिवस दिवस झोपा काढतात! एकदा आठ वाजता नवरा पॅकिंग करून बाहेर काढला की, ‘मी पडले उताणी; सहापर्यंत रेटाणी’ अशी अवस्था. मालतीबद्दल माधवचा असाच दृढ समज होता. पण तो शहाणा नवरा होता; बोलत नव्हता इतकच.
“किती करतेस?” माधवचे दोन शब्द ऐकले. फार पुरले मालतीला.
“इश्श, त्यात काय एवढं? माझं कर्तव्यच आहे ते.” माधवला सुखवीत मालू म्हणाली.
गाडी काढून माधव कार्यालयात गेला. जाताना मिस् मोनानं हात केला. मिस् मोनासाठी गाडी थांबली. दुचाकीवर मोना डार्लिंग स्वार झाली. खांद्यावर स्पर्श करीत ‘चल’ म्हणाली ‘चल’ स्वर्गसुखासारखे होते त्याच्यासाठी.
आपल्या बायकोचा स्पर्श सर्व पुरुष अनुभवतात पण ‘चल’चा स्पर्श सगळ्यांना मिळतोच असं नाही. भाग्य ज्याचे त्याचे! माधवचे ‘चल’ भाग्याचे होते.
छोटी छोटी बातों में भी बहुत दम होता है यारों!
“माधव, मी तुझी वाट बघत नाक्यावर थांबते. यू डोंट माईंड ना?
बघ बै! मला त्यात अपार सुख मिळतं.”
तिच्या ‘अपार सुखा’च्या वाक्यानं माधवला अपरंपार सुख प्राप्त झाले आसुसले. माधव म्हणाला, “एकेक, साबूदाणा वडा हो जाय.”
“हो. चालेल की ऑफिसात नको ‘मल्हार’ हॉटेल बरं! छान असतात तिथले साबूवडे.”
“आवडला शॉर्टफॉर्म! साबूवडा! बेष्ट!”
साबूदाणा वडा कुरकुरीत होता. दह्याबरोबर छान लागला. मोनासोबत होती ना! मग छान लागणारच!
मोनाचं ऑफिस आलं. माधवनं मोनाला उतरवली. “आता इव्हिनिंगला.”
“मी इथेच उभी राहीन.”
“नक्की नं?”
“नक्की रे!” त्याच्या खांद्यावर थाप ठोकत तिनं हलकंसं फ्लर्टिंग केलं.
माधव खूशम खूश होऊन गेला. इतना
तो बनता है ना एक लिफ्ट के लिये.
थोडी बहुत शाबासी! जास्तीची जरुरत नही! मालती है ना
उस कामके लिये! माधवने मनाची समजूत घातली.
त्याला आठवलं, एका भर सभेत कोणीतरी वक्ता म्हणाला होता, “आपलं एखादं तरी असावं असं प्रत्येक पुरुषाला वाटतं!
पण चुंबना पलीकडे मजल जात नाही.
छोटा मोटा फ्लटिंग. आपणापैकी बायको सोडून परस्त्रीशी मुक्यापर्यंत गेले नाहीत त्यांनी हातवर करावा.”
एक्कही हात उंच नाही.
मालती म्हणाली, “माधव, तू कर ना हात.”
“आणि काय बावळट ठरू?”
“माधव, एकनिष्ठ नवरा म्हंजे का बावळटपणा?”
माधवने उत्तर दिले नाही. बायको समजली. माधव लाजला. बहुतेक सर्व नवरे लाजले. असं
उघड ‘राम’पणा दाखवण्यात कलियुगातल्या नवऱ्यांना रस नसावा. ती वेळ तशीच निभली.
“असं चारचौघात विचारणं हे
औधत्य आहे. मी कुणाबरोबर पॅकिंग
केलं नाहीये. पण रागावू नकोस.
मला बावळट ठरवलं गेलं तर ते तुलाही पचणार नाही, रुचणार नाही.”
दिवसभर विचार करून ती मधून मधून दचकत होती. केरकर तिचे मित्र होते. माधवच्या बाबतीत त्यांना खडानखडा माहिती होती. कलीग होते तिचे. ‘पॅकिंग’ची गोष्ट
तिनं त्यांच्याशी शेअर केली. ‘पॅकिंग’बाबत त्यांना विचारलं.
“प्रत्येक पुरुष ‘पॅकिंग’कडे वेगळ्या नजरेनं बघतो. हलकी मिठी, बसचा धक्का, स्कूटरवरला खांदा स्पर्श, काहीही त्यात समाविष्ट असतं.” तेवढ्यात नवल घडले.
मैत्रिणीने खांद्यावरचा हात पटकन काढला.
“माधव, स्कूटर थांबव. मी ‘तसली’
बाई नाही. चीप!”
“अगं गंमत केली.”
“तरीपण थांबव.” तिचा आवाज रागेजला होता.
माधव घाबरला. स्कूटर कडेला थांबवली.
“उतर” तो जडपणे म्हणाला.
“आय अम सॉरी गं.” तो उतरल्या आवाजात म्हणाला.
“माधव, सांगू का? एक?” सांग ना!”
“थोडा थोडा पॅकिंग तो औरत को भी अच्छा लगता है.”
माधव समजला. त्याची स्कूटर परत सुरू झाली. पॅकिंग के साथ में…