मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात असली तरी रुग्णसंख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत वाढ होऊन १०० पेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून येत होती. दरम्यान रविवारी १२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात कोरोनाने शून्य मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ८१५ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत रविवारी १२३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात ९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६० हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४० हजार ३५१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८१५ सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६४९४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१० टक्के इतका आहे. मुंबईत रविवारी आढळून आलेल्या १२३ रुग्णांपैकी ११९ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २५ हजार ९५९ बेड्स असून त्यापैकी २४ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक बेड रिक्त आहेत.