Wednesday, March 19, 2025
Homeमहामुंबईतस्करीमुक्त देशासाठी आरपीएफचा एव्हीएसोबत सामंजस्य करार

तस्करीमुक्त देशासाठी आरपीएफचा एव्हीएसोबत सामंजस्य करार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

मुंबई (प्रतिनिधी) : तस्करीमुक्त देशासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) असोसिएशन फॉर व्हॉलंटरी अॅक्शन (AVA) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. देश तस्करीमुक्त करण्याच्या समान ध्येयाने एकत्र काम करण्याच्या दृष्टिकोनातून, रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक संजय चंदर यांनी ८ एप्रिल २०२२ रोजी कैलाश सत्यार्थी यांच्या उपस्थितीत कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन (KSCF) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रजनी सिब्बल यांच्याशी तपशीलवार चर्चा केली.

शनिवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून चर्चा पुढे नेण्यात आली. ज्यामध्ये आरपीएफ आणि एव्हीए (ज्याला बचपन बचाओ आंदोलन म्हणूनही ओळखले जाते) यांनी माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी, मानवी तस्करीविरूद्ध काम करण्याकरिता रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी, संवेदनशीलता वाढवण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करणे आणि मानवी तस्करीची प्रकरणे ओळखण्यात आणि शोधण्यात एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र काम करण्याची प्रतिज्ञा केली.

सामंजस्य कराराच्या चौकटीत दोन्ही हितधारकांनी केलेली संयुक्त कृती आरपीएफने देशभरात सुरू केलेल्या “ऑपरेशन AAHT” (मानवी तस्करी विरुद्ध कारवाई)चे प्रमाण, व्याप्ती आणि परिणामकारकता निश्चितपणे वाढवेल. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत २०१८ पासून ५०,००० हून अधिक मुलांची सुटका करण्यात आली असून रेल्वे मंत्रालय मुलांच्या सुटकेसाठी आणि इतर संबंधितांसोबत काम करण्यासाठी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार जबाबदारी पार पाडत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -