नेहरोलीत दोन ट्रकच्या धडकेत चालक जखमी

वाडा (वार्ताहर) : भिवंडी - वाडा महामार्गावर नेहरोली येथे शनिवारी सकाळच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेत दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाले असून, दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


वाडा-भिवंडी महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. या ठिकाणी एकेरी वाहतूक चालू आहे. लोखंडाने भरलेला ट्रक (क्रमांक डीएन. ०९ आर. ९६६५) हा वाड्यातून कुडूसच्या दिशेने जात असताना गॅस वाहतूक करणारा ट्रक (एमएच ०५ डीके ७७९२) समोरच्या दिशेने येऊन लोखंड वाहतूक करणाऱ्या
ट्रकला धडकल्याने मोठा अपघात झाला.


लोखंड घेऊन जाणारा ट्रकचालक विनोद कुमार यादव व दुसऱ्या ट्रकचा चालक दिलबाबहादूर थापा हे दोघेही जखमी झाले. विनोदला गंभीर दुखापत झाल्याने त्याला सुरत येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे, तर थापा याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

जलसारमधील बुलेट ट्रेनचा डोंगराखालील बोगदा पूर्ण

ग्रामस्थांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न प्रलंबित सफाळे : मुंबई–अहमदाबाद अवघ्या १ तास ५८ मिनिटांत जोडणाऱ्या

हिंदू विद्यार्थिनीकडून जबरदस्ती नमाज पठण

वाड्यातील आयडियल कॉलेजमध्ये वादग्रस्त प्रकरण वाडा : तालुक्यातील पोशेरी येथे असलेल्या आयडियल फाऊंडेशन

महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी नगरपालिकांतील नगरसेवक मैदानात

पदाधिकाऱ्यांनाही विधानसभा मतदारसंघ निहाय जबाबदाऱ्या नेत्यांची फळीही केली अधिक सक्रिय पालघर जिल्ह्यातील

महापालिकेच्या आखाड्यात रंगणार राजकीय कुस्त्या!

प्रभाग चारमधील लढतीकडे शहराचे लक्ष गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेची निवडणूक एकूण ११५ जागांसाठी होत आहे.

उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये बविआ मोठा पक्ष

काँग्रेसचे केवळ १० जागांवर उमेदवार विरार : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत

मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकवल्यानंतर १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

डहाणू : तलासरीच्या वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव सुरू होता.