अॅड. रिया करंजकर
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. या पूर्ण करताना माणसाचा जीव मेटाकुटीला येतो. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा सढळ हाताने मिळतो, तर काही लोकांना या तीन गरजांची जुळवाजुळव करताना आयुष्यच हातातून निसटून जातं. जेवढी लोकं श्रीमंत आहेत, त्याच्या कितीतरी पटीने लोक या पृथ्वीवर गरीबही आहेत.
मुंबई शहर म्हणजे स्वप्नांची नगरी. इथे प्रत्येकाला वाटत असतं की, एक छोटसं घर असावं. या घरासाठी माणूस पोटाला चिमटे घेऊन पै नी पै साठवून घर घेण्याचं स्वप्न बघत असतो आणि हे स्वप्न जर अचानक कोणी हिरावून घेतलं तर पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं.
रामलाल मध्य प्रदेशचा रहिवासी कामधंद्यासाठी मुंबई शहरात आला व आपल्यास नातलगांची सोबत भाड्याने राहू लागला या स्वप्ननगरीत आपले घर असावं असं त्याला वाटू लागलं. पत्र्याचं झोपडं का असेना पण आपलं स्वतःचं घर असावं, असं त्याला मनापासून वाटू लागलं आणि तशी तो मेहनत करू लागला, पैसे साठवून त्याने बोरिवली येथील झोपडपट्टीमध्ये एक पत्र्याचे घर विकत घेतलं आणि त्याच्यात तो राहू लागला. पुढे-मागे गावाकडून आपल्या कुटुंबाला घेऊन यायचं असं त्याने ठरवलं आणि झोपडीवजा घरामध्ये तो स्वप्न रंगू लागला. एक-दोन वर्षं त्यांनी त्या घरामध्ये काढले.
तोपर्यंत नवीन निर्माण होत चाललेल्या झोपडपट्टीला रूम नंबर होते आणि लाइट बिल ही नव्हते फक्त होतं ते मालकाचं एग्रीमेंट आणि याच दरम्यान रामलालच्या गावाकडे जमिनीवरून वाद होऊ लागले म्हणून रामलाल याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या घरामध्ये कोणी तरी भाडोत्री ठेवावा, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. पण पहिल्यांदा तो गाव आणि मुंबई असं करू लागला. आपण पै पै साठवून मुंबईमध्ये घर घेतलं होतं ते आपल्या ताब्यात हवं, असं त्याला वाटत होतं. तोपर्यंत त्याने भाडोत्री ठेवला नव्हता. पण आजूबाजूच्या नातलगांचा एकूण त्याने भाडोत्री ठेवला तोही ओळखीचाच. झोपडी असल्यामुळे त्याने अॅग्रीमेंट केली नाही आणि गावाकडे निघून गेला. वर्षातून दोन-तीन वेळा तो मुंबईत यायचा आणि भाडे घ्यायचा काही नातलगांच्या समजावून यावरून त्याने पहिल्या भाडोत्रीला रूम खाली करायला सांगितला आणि दुसरा भाडोत्री भरला त्या भाडोत्रीला वर्ष झाल्यानंतर त्याने तो रूम खाली केला. यावेळी रामलाल गावी होता. रामलालचा रूम खाली होता व त्याची घराची चावी त्याच्या नातलगाकडे होती. त्यावेळी पहिल्या भाडोत्रीने त्या नातलगाला विनंती केली की, मला काही दिवस या घरांमध्ये राहू दे, त्या नातलगाने रामलाल याला पूर्वसूचना न देता आपल्या ताब्यातील चावी त्या पहिल्या भाडोत्रीला दिली व तो भाडोत्री त्या रूममध्ये राहू लागला आणि त्याच दरम्यान कोरोनासारखी महामारी आली आणि रामलाल गावीच अडकला. कोरोनाचा कहर कमी झाल्यावर. रामलाल मुंबईला आला व त्याने तिला रूम खाली करायला सांगितले तेव्हा तो भाडोत्री म्हणाला की, हा रूम माझा आहे. मी तुम्हाला ओळखत नाही. मी हा रूम एका व्यक्तीकडून विकत घेतला आहे आणि त्या भाडोत्रीने त्या रूमवर स्वतःच्या नावे लाइट बिल केले. स्वतःच्या नावे रेशन कार्ड काढले आणि तोपर्यंत रामलालला कोणतीही खबर लागू दिली नाही. विचारायला गेला तर मी तुम्हाला ओळखत नाही, असं तोंडावर त्याला सांगण्यात आलं आणि रूमबद्दल कोणी लोक चौकशी करायला येतील म्हणून घराला सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेण्यात आला. त्याला रूम राहायला दिला होता. तोही विचारायला गेला असता मी तुम्हाला ओळखत नाही, असं त्या भाडोत्रीने सांगितलं. झोपडपट्टीत रूम असल्यामुळे त्यावेळी मीटर लागले नव्हते आणि नेमके कोरोना काळामध्ये तिथे मीटर लावण्याची सुरुवात झाली होती. तोपर्यंत त्या ठिकाणी लाइट नव्हते आणि त्याचा फायदा जबरदस्तीने घुसलेल्या भाडोत्रीने घेतला. पैसे साठवून कष्टाने रामलालने रूम घेतला होता. तो दुष्ट हेतूने भाडोत्रीने बळकावला आणि आता रामलाल पोलीस स्टेशन स्थानिक नेते यांच्याकडे येरझाऱ्या घालत आहे. गावाकडची कामे सोडून तो आपल्या घरासाठी एकटाच लढत आहे.