Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरकंपनीमधील मारहाणीत ८० कामगार, १६ पोलीस जखमी

कंपनीमधील मारहाणीत ८० कामगार, १६ पोलीस जखमी

पालघरमध्ये युनियनच्या वादातून दगडफेक, वाहनांचे नुकसान

बोईसर (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील विराज प्रोफाइल कंपनीमध्ये कारखाना व्यवस्थापन पुरस्कृत कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात असल्याने आक्रमक झालेल्या कामगारांनी कंपनीतील कंत्राटी कामगार आणि अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. दगडफेक आणि मारहाणीत ७० नेते, ८० कामगार, १६ पोलीस जखमी झाले आहेत. कंपनीच्या आवारातील चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले. याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मुंबई लेबर युनियनचे संजीव पुजारी यांच्यासह २७ कामगारांना अटक केली आहे.

विराज प्रोफाइल कारखान्यात युनियनच्या वादावरून शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गदारोळ झाला होता. यावेळी आक्रमक कामगारांकडून कारखान्यातील कंत्राटी कामगार आणि अधिकाऱ्यांना मारहाण सुरू असताना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी दगडफेक केली होती. विराज ग्रुपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून युनियन स्थापनेवरून वाद सुरू होता. मुंबई लेबर युनियनच्या बाजूने ६० टक्क्याहून अधिक कामगार असल्याने मुंबई लेबर युनियनच्या नावाने नोंदणीही केली आहे. परंतु कंपनी व्यवस्थापन लेबर युनियनला थारा देत नाही. कारखान्यात इतर युनियनला सहकार्य करून मुंबई लेबर युनियनला कंपनीमध्ये शिरकाव करू देत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी पसरली होती. अखेर नाराजीचे रूपांतर दगडफेक व मारहाणीत झाले.

कंपनी पुरस्कृत युनियनचे कामगार आणि कंपनीने तैनात केलेले दीडशे बाऊन्सर यांनी दुसऱ्या युनियनच्या कामगारांवर जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत ८० कामगारांसह १६ पोलीस जखमी झाले आहेत. तीन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -