मुंबई : गुढीपाडव्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा तडाखा सुरु केला. त्यापाठोपाठ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेण्यास सुरुवात केल्यावर आता यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. मागील १५ दिवसांत त्यांच्यावर झालेल्या टिकेला उद्धव ठाकरे हे १४ मे रोजी सभा घेऊन उत्तर देणार आहेत.
या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात सवाल जवाब रंगणार आहे. फडणवीस हे १५ मे रोजी मुंबईत सभा घेऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार आहेत.