मुंबई : विलेपार्ले पश्चिम येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) कार्यालयाला भीषण आग लागली आहे. एलआयसीच्या कार्यालयाच्या संपूर्ण मजल्यावर आग पसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आग लागली त्यावेळी इमारतीत जास्त कर्मचारी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पण आगीत अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सर्व महत्वाची कागदपत्रे आणि डाटा सुरक्षित असल्याचे आयुर्विमा महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.