वसई (वार्ताहर) : अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमधल्या मुलांमध्ये हिपॅटायटीस किंवा यकृताच्या जळजळीच्या प्रकरणांमध्ये अनाकलनीय वाढ झाल्याने तज्ज्ञ चिंतेत आहेत. जानेवारीमध्ये ब्रिटनमध्ये अशी काही प्रकरणे प्रथम आढळून आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, २१ एप्रिलपर्यंत हिपॅटायटीसची २०० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जपानमध्येही एक प्रकरण आढळून आले. सर्व प्रकरणे एक महिना ते १६ वर्षं वयोगटातल्या मुलांची आहेत. १७ मुलांचे यकृत प्रत्यारोपण करावे लागले तर एका मृत्यूची नोंद झाली.
हिपॅटायटीस ए, बी, सी, डी आणि ई परस्परांपासून भिन्न आहेत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अमेरिकन या आरोग्य संस्थेने याबाबत अलर्ट जारी केला आहे. एडिनोव्हायरस या विषाणूंच्या समूहामुळे त्याचा प्रसार होत असल्याचा संशय आहे. एडिनोव्हायरसचे ९९ प्रकार आहेत. ते मानवांना संक्रमित करू शकतात. वैयक्तिक संपर्क, श्वसन आणि संक्रमित पृष्ठभागाद्वारे तेपसरतात.
विषाणूंच्या अनुवंशिक स्वरुपात बदल झाला आहे का, त्यामुळे किरकोळ संसर्ग होण्याऐवजी थेट यकृताला हानी पोहोचली आहे का, याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेनेनुसार, एडेनोव्हायरस स्ट्रेन एफ-४ हे यामागील कारण असण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, कोविड निर्बंधांच्या काळात मुले सामान्य विषाणूच्या संपर्कात आली नाहीत.
आता घराबाहेर पडल्यानंतर त्यांना एकामागून एक विषाणूंचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रतिक्रिया देत आहे. शास्त्रज्ञ हे तपासत आहेत की कोरोना व्हायरसमुळे मुलांना हेपेटायटीस अधिक असुरक्षित बनवते. त्यामुळे त्यांना एडिनोव्हायरसची लागण होते. ही अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. तथापि, जगभरात लहान मुलांची संख्या प्रभावित झाली आहे. मुलांनी वॉशरूममधून आल्यानंतर आणि जेवणापूर्वी हात धुवावेत, असे या अानुषंगाने सुचवले आहे.