सिंधुदुर्ग : कणकवली शहरातील हॉटेल मंजुनाथ ते मुख्य नाल्याला जोडणाऱ्या गटारा चे काम अपूर्ण असल्याबाबत वारंवार लक्ष वेधूनही ते पूर्ण केले जात नसल्याने १६ मे रोजी कणकवली हॉटेल मंजुनाथ समोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, स्थानिक लोकांच्या मागणीनुसार मी आपणाकडे हॉटेल मंजुनाथ ते मुख्य नाल्याकडे जोडणारे महामार्गालगतचे अपूर्ण गटार पूर्ण करण्यासंदर्भात वांरवार मागणी केली होती. पावसाळा जवळ आल्यामुळे हि मागणी पूर्ण करण्यासंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन आम्हाला मिळाले नाही. सदर ठिकाणी गटाराचे बांधकाम अंदाजे १० मी. आहे. पावसाळ्यापूर्वी कॉन्क्रीट गटाराचे बांधकाम न केल्यास किमान १५ व्यापारी गाळे व २ निवासी संकुल बाधित होणार आहेत. तरी आपण माझ्या मागणीचा विचार करून गटार बांधकामाचा ठोस निर्णय घ्यावा अन्यथा १६ मे २०२२ रोजी सकाळी ठीक ११.०० वा . हॉटेल मंजुनाथ समोर रस्ता रोको आंदोलन करणार आहे, असा इशारा श्री परुळेकर यांनी दिला आहे.