नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातच कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रुग्णांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,८०५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २२ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल ५,२४,०२४ लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येत्या १० ते १५ दिवसांत भारतातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाची लक्षणे प्रत्येकालाच सारखी जाणवतात, असे नाही. तसेच हा व्हायरस प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो.
काही लोकांना या व्हायरसमुळे गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो. तर काही लोकांमध्ये याची फक्त सौम्य लक्षणे दिसतात. कोणतेही लक्षण नसलेले लोक इतरांना सहज संक्रमित करू शकतात.
ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, विशेषत: ६ ते १३ वयोगटातील मुलांना कोरोनाची लक्षणे नसतात. कारण त्यांना श्वसनासंबंधी विषाणूजन्य आजार होण्याची अधिक शक्यता असते.
जेव्हा या वयातील मुलांना कोरोना होतो तेव्हा ते कमी धोकादायक असते. याशिवाय, रोगाची गंभीरता ही एखाद्या व्यक्तीच्या लसीकरण स्थितीवर आणि तीव्र संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते.
तुम्ही लक्षणं नसलेले आहात की नाही हे तुम्ही कोरोनाची आरटी-पीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करून माहीत करून घेऊ शकता. कोरोनाची लागण होऊनही तुमच्या शरीरात कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी तुम्ही तुमची टेस्ट करून घ्यावी आणि स्वतःला क्वारंटाईन करावे.
ताप, कफ, वास न येणे, चव न लागणे, सर्दी, थकवा जाणवणे, डोकेदुखी, श्वासोच्छवासाची समस्या, स्नायू किंवा शरीर दुखणे, घसा खवखवणे, उलट्या होणे, अतिसार, त्वचेवर पुरळ उठणे, डोळ्यात जळजळ आणि लालसरपणा, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणेही अनेक कोरोना रुग्णांना जाणवत आहेत.
ज्या लोकांना नुकतेच कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यामध्ये मळमळ, अतिसार, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ आणि पोट फुगणे यासारखी लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे.