Sunday, July 21, 2024
Homeक्रीडाआशियाई गेम्सवर कोरोनाचे सावट

आशियाई गेम्सवर कोरोनाचे सावट

चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे तारखा बदलणार

मुंबई (वृत्तसंस्था) : चीनमध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता सप्टेंबरमध्ये होणारी १९वी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेने सांगितले की, आशियाई क्रीडा स्पर्धेची तारीख बदलली जाऊ शकते.

पुढील तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. आशियाई क्रीडा स्पर्धा १०ते २५ सप्टेंबर दरम्यान चीनच्या शिनजियांग प्रांतातील हांगझूसह पाच शहरांमध्ये होणार होत्या. १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे नाव आणि चिन्ह कायम राहणार आहे या मल्टी-स्पोर्टिंग स्पर्धेत एकूण ४० क्रीडा प्रकारांतील ६१ स्पर्धा होणार होत्या. ज्यात ११,००० क्रीडापटू सामिल घेणार होते.

यामध्ये जलतरण, तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, घोडेस्वारी, तलवारबाजी, फुटबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी आणि ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या इतर खेळांचा समावेश आहे. तसेच यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल ११ वर्षांनंतर टी-२० चे पुनरागमनही होणार होते. भारताने १९९० वगळता प्रत्येक आशियाई क्रीडा स्पर्धेत किमान एक सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच वेळी, पदकतालिकेतील पहिल्या १० देशांमध्ये नेहमीच भारताचा समावेश होत राहिला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत १३९ सुवर्ण, १७८ रौप्य आणि २९९ कांस्य पदके जिंकली आहेत.

चीनमध्ये कोरोनामुळे अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. २०२२ पॅरालिम्पिक आणि हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा देखील कठोर नियम आणि निर्बंधांसहित आयोजित करण्यात आल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -