Saturday, July 13, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे महापालिकेचे अग्निशमन दल होणार हायटेक...

ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल होणार हायटेक…

६ हाय राईझ फायर फायटींग व्हेईकलचा समावेश

ठाणे (प्रतिनिधी) : राज्याच्या नगर विकास विभागाने २०२० साली आणलेल्या यूनिफाईड डीसीपीआरमुळे उंच इमारती बांधण्याच्या मर्यादा हटल्या. त्यामुळे आता शहरात हायराइज इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र केवळ हायराइज इमारती बांधून चालणार नाही, तर या इमारतींची अग्निसुरक्षा देखील महत्वाची असल्याने भविष्यातील ही समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महापालिकेने आताच याचे नियोजन केले आहे. ४० ते ४५ मजल्यांच्या इमारतींना आग लागल्यास विझविण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यात ६ हाय राईझ फायर फायटींग व्हेईकलचा समावेश करण्यात आला आहे.

ही फायर फायटिंग व्हेइकल्स २०० मीटरपर्यंत पाण्याच्या फवारा मारू शकतात. याशिवाय यामध्ये जवळपास १२ हजार लिटर क्षमता टँक असलेले हे व्हेईकल असून आता काही प्रमाणात असलेल्या आणि भविष्यात होऊ घातलेल्या इमारतींची यामुळे अग्निसुरक्षा चोख होणार आहे.

यूनिफाईड डीसीपीआरमधील नियमावलीतल्या नव्या सुधारणांमध्ये उंचीचे निर्बंध हटविण्यात आले असून पुनर्विकासाच्या इमारती ७० मीटर पर्यंत म्हणजे २१ ते २२ मजल्यांपर्यंत झेप घेऊ शकतात. अग्निशमन विभागाचे अत्याधुनिकरण करण्याच्या बाता मारणाऱ्या पालिका प्रशासनाकडे २५ मजल्यांच्या वर असलेल्या इमारतींना आग लागल्यास अग्निशमन विभागाची मोठी धावपळ होते.

शहरात दुसरीकडे नव्या यूनिफाईड डीसीपीआरमुळे इमारतींवरील मर्यादा हटल्याने भविष्यात मोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्याच्या सुरक्षेचा विचार करून ६ हाय राईझ फायर फायटींग व्हेईकलची खरेदी करण्यात आली आहे. या प्रकारच्या फायर वाहनांचा अग्निशमन वाहन ताफ्यात समावेश झाल्याने अग्निशमन विभागाची वाहन क्षमता वाढणार आहे. पर्यायाने अग्निशमन दलाची कार्यक्षमता वाढणार आहे. या वाहनाचा अग्निशमन दलास चांगल्या प्रकारे उपयोग होणार असल्याचा दावा अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.

हाय राईझ फायर फायटींग व्हेईकलची वैशिट्ये :

– २०० मीटर उंची पर्यंत पाण्याचा प्रवाह नेणारे अद्ययावत तंत्रज्ञान

– वॉटर टैंक क्षमता १२००० लिटर.

-२०० मीटर उंची पर्यंत स्थिर गती व दाबाचा पाण्याचा प्रवाह

लाईटवेट होज पाईप व उच्च दाबावर कार्य करण्यास सक्षम

– अद्ययावत कंट्रोल पैनल

– फायर फायटींग वॉटर पंप २००० ते ६००० एल.पी.एम.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -