हँगझोव : चीनमध्ये ‘हँगझोव’ येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या १९ व्या एशियन गेम्स पुढे ढकलण्यात आली आहे. ऑलम्पिक कॉन्सिल ऑफ एशियाकडुन ही माहीती देण्यात आली.
ऑलम्पिक कॉन्सिल ऑफ एशियाकडुन, एशियन गेम्सच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहीती त्यांनी पोस्ट केली आहे. १० ते २५ सप्टेंबर दरम्यान एशियन गेम्स होणार होत्या. मात्र गेम्स का पुढे ढकलण्यात आल्या हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.