कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज नवीन अद्ययावत ई-गव्हर्नन्स प्रणालीतील वेबसाइटचे सॉफ्ट लाँच ऑनलाइन स्वरूपात, एसकेडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे व आयटी मॅनेजर प्रशांत भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत केले.
त्यामुळे महापालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा आता एका क्लिकमध्ये (ऑनलाइन स्वरूपात) नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. महापालिकेची २००२ मध्ये सुरू झालेली ई-गव्हर्नन्स प्रणाली आता कालबाह्य झाल्यामुळे एसकेडीसीएलमार्फत अत्याधुनिक अशी नवीन तंत्रज्ञानावर आधारित ई-गव्हर्नन्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
यामध्ये मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, लायसन्स फी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तक्रार निवारण सेवा इ. सेवा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहेत.