Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीअमित ठाकरेंच्या तान्हुल्याचा नामकरण सोहळा संपन्न

अमित ठाकरेंच्या तान्हुल्याचा नामकरण सोहळा संपन्न

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या मुलाचे आज शिवतीर्थवर थाटामाटात बारसे झाले. ठाकरे कुटुंबात आगमन झालेल्या नव्या पाहुण्याचे नामकरण ‘किआन’ असे करण्यात आले आहे. कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत नामकरणाचा छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी आपल्या बाळाचा पहिला फोटो फेसबुकवर शेअर केला होता. अमित-मिताली यांना पूत्ररत्न झाल्यापासून ‘शिवतीर्थ’वर एक वेगळाच आनंद व्यक्त होत आहे.

२७ जानेवारी २०१९ रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह झाला होता. लोअर परळमधील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे वडिलही प्रसिद्ध सर्जन आहेत.

किआन नावाचा नेमका अर्थ

‘किआन’ हे हिंदू धर्मातील नाव आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा, प्राचीन, राजेशाही असा आहे. याची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे. किआन हे मूळ संस्कृत नाव असून याचा अर्थ देवाचा आशीर्वाद असा होतो. किआन हे भगवान विष्णूचे दुसरे नाव आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -