ब्राझीलीया (वृत्तसंस्था) : जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू अशी ख्याती असलेला डिएगो मॅराडोनाने १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत परीधान केलेल्या जर्सीचा ६७.५८ करोड रुपयांना (७.१ मिलियन पाऊंड) लिलाव झाला आहे.
१९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत एक वादही जोडला गेला होता. त्याला ‘हँड ऑफ गॉड गोल’ यासाठीही ओळखले जाते. या सामन्यात मॅराडोनाच्या एका गोलवरून वाद झाला होता. मॅराडोना हेडरने गोल करण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू कथित स्वरूपात त्याच्या हाताला लागून गोल पोस्टमध्ये गेला.
रेफरीला ते दिसले नाही आणि त्याने गोल जाहीर केला. या सामन्यात मॅराडोनाने इंग्लंडच्या संघाला आपल्या ड्रिबलिंगने चकवून गोल करत संघाला यादगार विजय मिळवून दिला होता.