देहराडून : १२ ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनंतर आज, शुक्रवारी सकाळी ६.२५ वाजताच्या शुभ मुहुर्तावर भाविकांसाठी खुलं करण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला. मंदिर उघडण्याच्या वेळी हजारोंच्या संख्येने भाविकही उपस्थित होते. मंदिराला फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट करण्यात आली होती. यासाठी सुमारे १० क्विंटल फुलांचा वापर करण्यात आलं. मंदिर उघडण्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासूनच भाविकांची रीघ पाहायला मिळाली. केदारनाथचे मंदिर हे उत्तर आणि दक्षिण भारतातील धार्मिक संस्कृतीचा संगम मानला जातो.
गुरुवारी सकाळी गौरीकुंड येथून हजारो भाविक केदारनाथ धामकडे रवाना झाले. भाविकांनी येथून सुमारे २१ किमी अंतर पायी, घोडा किंवा पिठूने पार केले. गुरुवारी सकाळी ६ वाजता सुरू झालेला प्रवास केदारनाथ धाम येथे सायंकाळी ४ वाजता संपला. क्षमतेपेक्षा जास्त भाविक आल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. शुक्रवारी सकाळी सर्वांना केदारनाथला जाण्याची परवानगी देण्यात आली.
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ धामचे स्थान तिसरे आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उघडण्यात आले. केदारनाथ मंदिर आज खुलं करण्यात आलं आहे. तर यानंतर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे ८ मे रोजी खुले करण्यात येणार आहेत.
उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…
नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…
जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच…
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror…