कल्याण (वार्ताहर) : कल्याण स्टेशन परिसरातील एसटी स्टँन्ड गेटवर बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला मंगळवारी रात्रीच्या सुमारास कल्याण महात्मा फुले पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पेट्रोलिंग डयुटी करीत असलेल्या पोलिसांना एसटी स्टॅन्डजवळ काही तरुण बनावट चलनी नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास सपोनि दिपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचुन रजनेश कुमार चौधरी, हर्षद नौशद खान, अर्जुन कुशवह, या १९ वर्षीय कल्याण पूर्वेकडे राहणाऱ्या त्रिकुटाला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून भारतीय चलनातील ५०, १००, २०० रूपये दराच्या एकुण २५,००० रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या.
तसेच त्यांच्याकडील रेडमी कंपनीचा मोबाईल फोन व टीव्हीएस स्कुटी मोटारसायकल क्र. एम.एच.१४ एफ.बी.१८९९ ही गाडी जप्त केली आहे. याप्रकरणी आरोपींविरूध्द गुन्हा रजि.नं.२६५/२०२२ भा.द.वि. कलम ४८९ (ब) (क), ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिपक सरोदे करीत आहेत.