Thursday, December 12, 2024
Homeमहत्वाची बातमीमंदिरांवरील भोंगे उतरविणार असाल तर सरकारची दादागिरी चालणार नाही

मंदिरांवरील भोंगे उतरविणार असाल तर सरकारची दादागिरी चालणार नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अजित पवारांना इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदूंच्या मंदिरांवरील भोंगे उतरविणार असाल तर सरकारची दादागिरी चालणार नाही, असा खणखणीत इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.

मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे यांना अजित पवार यांनी नाशिकच्या सभेत दादागिरी चालणार नाही असा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर देत नारायण राणे म्हणाले की, हिंदुंची भूमिका मांडत होते म्हणून पवार यांना ती दादागिरी वाटली. परंतु, हिंदूंच्या मंदिरावरील भोंगे उतरवणारे अजित पवार हे पहिले हिंदू असतील, हे आमचे दुर्देवं, अशी टिका नारायण राणे यांनी केली. भोंगे उतरवण्याच्या विरोधात अजित पवारांनी केलेल्या विधानावर राणेंनी ट्विट करत मत व्यक्त केले आहे.

“उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत की, शिर्डी मंदिरावरचा भोंगाही उतरवावा लागेल. हिंदू मंदिरावरील भोंगे, हरिनाम सप्ताह, जागरण-गोंधळ, काकड आरती यांवर कारवाई करून दाखवाच, असे थेट आव्हान नारायण राणे यांनी दिले आहे.

नुकत्याच येवल्यात झालेल्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की, “उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी असं केलं तसं केलं असं सांगत आहेत. पण माहिती घ्या त्यांनी काही भोंगे बंद केले त्यांनी केवळ मशीदींवरील भोंगे बंद केलेले नाहीत. तर मंदिरांवरील भोंगेही बंद केले आहेत. आपल्याकडे साईबाबांच्या मंदिरात शिर्डीत काकड आरती पहाटे ५ वाजता असते. सुप्रीम कोर्टाने माईक सहा वाजता सुरु करायला सांगितला आहे. यावर कुणी ऑबजेक्शन घेतले नाही.

आपल्याकडे जागरण गोंधळ किती वाजता असतो रात्रीचं ना? गावागावांमध्ये हरिनाम सप्ताह कधी असतो? रात्रीचं असतो ना? विविध प्रकारचे कितीतरी कार्यक्रम उरुस, जत्रा आणि विरंगुळ्याचे कार्यक्रम रात्रीच होतात ना? जर यामध्ये कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत नसेल तर उठसूठ पोलीस यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. याकडे आपण थोडसं दुर्लक्ष करतोच ना? मग असं असताना कशासाठी वातावरण खराब करण्याचं काम सुरु आहे?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -