नाशिक (प्रतिनिधी ) : नाशिक महानगरपालिका सातपूर विभागातील कार्बन नाका ते भोसला स्कुल या ठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी ५०० एमएम व्यासाची सिमेंटची पाइप लाईन बदलून ७०० एमएम व्यासाची नवीन लोखंडी (D. I. किंवा M.S.) पाइपलाइन टाकावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या उपाध्यक्ष नगरसेविका प्रा. डॉ. वर्षा अनिल भालेराव यांनी मनपा आयुक्त रमेश पवार यांच्याकडे एका केली आहे.
याबाबत सांगताना प्रा. भालेराव यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांपूर्वी ही लाइन टाकण्यात आलेली आहे; परंतु सध्या ही पाइपलाइन वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी लीकेज होत आहे, फुटते आहे. त्यामुळे अनेक वेळा या लाइनवरील असलेला पाणीपुरवठा लाइन दुरुस्तीसाठी वेळोवेळी बंद केला जातो.
गंगापूर धरण समूहामध्ये पिण्याच्या पाण्याचा उपयुक्त मोठा साठा असूनही नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो तसेच मनपालाही या लाइनच्या दुरुस्तीसाठी मोठा वेळ आणि खर्च सातत्याने करावा लागत आहे. या पाण्याच्या लाइन वरून रामराज्य जलकुंभ, बळवंत नगर जलकुंभ, नहूश जलकुंभ, गणेश नगर जलकुंभ, ध्रुवनगर जलकुंभ अशा ५ जलकुंभाना रोज लक्षावधी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो आहे याच लाइनवर सध्या काम चालू असलेल्या व्हिजडंम हायस्कुल जलकुंभ व नहुश जलकुंभ येथेही पाणी पुरवठा होणार आहे.
सावरकर नगर, एस. टी. कॉलोनी परिसर, माणिक नगर,डी. के. नगर, पाइपलाइन रोड, आनंदवली, गणेश नगर, बळवंत नगर, ध्रुव नगर, गंगापूर रोड,कॉलेज रोड, महात्मा नगर, येथील लाखो नागरिकांना याच जलकुंभातून पाणीपुरवठा होतो आहे.
सध्या ही सिमेंटची लाइन वारंवार फुटत असल्याने ती तत्काळ बदलावी व त्या ठिकाणी या भागातील भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ७०० मीमी व्यासाची नवीन लोखंडी ( D.I. किंवा M.S.) पाइपलाइन टाकावी व या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.