Sunday, January 19, 2025
Homeमहामुंबईआयआयटी मुंबईच्या अॅपवर हवामानाचे अंदाज

आयआयटी मुंबईच्या अॅपवर हवामानाचे अंदाज

मुंबई (प्रतिनिधी) : शेतकरी किंवा मासेमारी करणाऱ्या नागरिकांसाठी हवामानाची अचूक माहिती असणे खूप गरजेचे असते, या हवामानाच्या अंदाजामुळे त्यांना पुढील निर्णय घेण्यास सोपे जातात. त्यामुळे नागरिकांना हवामानाची माहिती मिळावी म्हणून आयआयटी मुंबई एक ऍप उपलब्ध करुन देणार आहे.

या नवीन उपक्रमासाठी आयआयटी मुंबईने भू विज्ञान मंत्रालयाशीही सहकार्य करार केला असून, याद्वारेही हवामान बदलासंदर्भात संशोधन केले जाणार आहे. या नविन उपक्रमामुळे नागरिकांना त्वरित त्यांच्या मोबाईलवर हवामानाची स्थिती समजनार आहे.

देशाला सन २०७०पर्यंत ‘शून्य उत्सर्जना’चे उद्दिष्ट्य साध्य करायचे आहे. या प्रवासात आयआयटी मुंबई तंत्रज्ञानावर आधारित सुविधा घेऊन सहभागी होणार आहे. यासाठी दहा वर्षांपूर्वी आयआयटीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन क्लायमेट सर्व्हिसेस’च्या माध्यमातून विशेष पावले उचलली जाणार आहेत.

संबंधित अॅपचा फायदा देशातील शहरी तसेच ग्रामीण भागांतील विविध वापरकर्त्यांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर या सहकार्यामधून सेन्सॉर्स, ड्रोन आधारीत स्मार्ट मॉनिटरिंग प्रणाली, स्मार्ट अॅग्रीकल्चर तंत्रज्ञान, स्वयंचलित पूर्वसूचना प्रणाली, आरोग्य आणि हवामान, स्मार्ट पॉवरग्रिड व्यवस्थापन, उष्णतेच्या लाटेचा अंदाज अशा विविध बाबींवर संशोधन होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -