नाशिक (प्रतिनिधी) : बंगल्याच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सुमारे पावणेदोन लाखांचा सोन्याचा ऐवज चोरून नेल्याची घटना गंगापूर रोड येथे घडली.
फिर्यादी अशोक गणपतराव अवताड (वय ५८) हे गंगापूर रोडवरील प्रोफेसर कॉलनीतील वेदांत बंगल्यात राहतात. २४ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या पाठीमागूल उघड्या दरवाजातून घरात फिर्यादीचा मुलगा सागर याच्या बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटात असलेले १ लाख ६० हजार १४१ रुपये किमतीच्या तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन बांगड्या व २० हजार रुपये किमतीचा पाच ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा कॉईन असा एकूण १ लाख ८० हजार १४१ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.