Tuesday, July 16, 2024
Homeमहत्वाची बातमीप्रदीप शर्मा हेच मनसुखच्या हत्येत मुख्य सूत्रधार

प्रदीप शर्मा हेच मनसुखच्या हत्येत मुख्य सूत्रधार

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

मुंबई : राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) मनसुख हिरेन हत्येप्रकरणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुखच्या हत्येत मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे.

या हत्येचा कथित कट हा मुंबई पोलीस आयुक्तांच्या इमारतीत रचला होता. जिथे प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी अनेक बैठकांना उपस्थित होते, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

मनसुखची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचेही नमूद केले आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ही स्कॉर्पिओ हिरेन यांच्या नावावर होती. या घटनेनंतर ५ मार्चला मुंब्रा इथल्या रेतीबंदर भागात मनसुखचा मृतदेह सापडला होता. मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली, असून आणखी ८ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -