
मुंबई (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि मर्यादित षटकाचा कर्णधार किरॉन पोलार्डने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, ज्यानंतर पोलार्ड हा संघाचा कर्णधारही असल्याने नवा कर्णधार कोण? हा प्रश्न सर्वांना पडला होता.
अशात वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात ट्वीट करत सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार निकोलस पूरन असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
https://twitter.com/windiescricket/status/1521521104539590658आपल्या निवेदनात सांगितले आहे की, “त्याची नियुक्ती २०२२ मध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आणि ऑक्टोबर २०२३ मधील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी करण्यात आली आहे. दुसरीकडे, शाय होपकडे वनडे संघाचे उपकर्णधारपद सोपवले आहे.”
कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पूरन म्हणाला की, “वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्याचा मला खरोखरच सन्मान वाटतो. कर्णधार हे माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचे मुख्य आकर्षण राहिले आहे. मी माझ्या चाहत्यांसाठी मैदानावर उत्कृष्ट गोष्टी साध्य करत संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.” कर्णधाराच्या रूपात त्याची पहिली वनडे मालिका नेदरलँडमध्ये ३१ मेपासून सुरू होणार आहे.