मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर राज्यात आज अनेक ठिकाणी पहाटेची पहिली अजान ही भोंग्याविना झाली. मात्र, मुंबईत काही ठिकाणी मशिदींवरील भोंगे सुरूच होते. त्यापार्श्वभूमीवर आता गृहमंत्रालयाने अशा १३५ मशिदींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील अनेक मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळत आज पहाटेच्या पहिल्या अजानवेळी भोंगे बंद ठेवले. मात्र, काहींनी आदेश न जुमानता भोंग्यांवरून अजान दिली. यावर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे.