Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रठाणे५५० फूट उंच स्काँटिश कडा सर करून हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

५५० फूट उंच स्काँटिश कडा सर करून हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

कल्याण (वार्ताहर) : सह्याद्रीच्या पर्वत रांगेत फिरताना असंख्य आणि मनात धडकी भरवणारे सुळके आणि कडे दृष्टीसमोर येतात. त्यातच सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या हरिहर गडाच्या बाजूचा भीमकाय कडा म्हणजे ‘स्कॉटिश कडा’. कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा कडा सर करीत एकत्रित महाराष्ट्र हितासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

या विशेष मोहिमेची सुरुवात निरगुडपाडा येथून करीत सुमारे २ तासाचा ट्रेक करीत स्कॉटिश कड्याच्या पायथ्याशी सहयाद्री रॉक ऍडव्हेंचर संघाचे सदस्य पोहोचले. अंगा खांद्यावर भगवे झेंडे आणि गिर्यारोहणाचे अवजड साहित्य घेऊन आरोहणाची सुरुवात झाली. कड्यावर दोरीच्या साहित्याने सहयाद्री रॉक ऍडव्हेंचर संघाने सेटअप हा लावला होता. त्यावर झुमरिंग करून एक एक गिर्यारोहक हा हळूहळू कड्याच्या टोकाकडे वाट करत होता. सुमारे ६ स्टेशनमध्ये विभागलेला स्कॉटिश कडा ज्यावर प्रत्येक स्टेशनवर सहकार्यासाठी नेमलेले सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचे स्वयंसेवक इतरांना वर यायला मदत करत होते.

कडा खूपच उंच असल्याने गिर्यारोहकांची दमछाक होत असताना मोहीम सुखरूप पार पडावी म्हणून कड्याच्या पायथ्याशी शिवरायांची आरती करण्यात आली. तसेच कड्याचे पूजन करण्यात आले. या मोहिमेत विशेष आकर्षण ठरले ते ग्रीहिता विचारे या लहान मुलीचा मोहिमेत सहभाग होता. या विशेष मोहिमेत सह्याद्री रॉक अॅडव्हेंचरचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, प्रदीप घरत, नितेश पाटील, सुनील खनसे, कल्पेश बनोटे आणि प्रशिल अंबाडे हे उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -