मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुढील ४८ तासांत माफी मागितली नाही, तर आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी विक्रांत घोटाळ्या प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप करत मानहानी खटला दाखल करण्याबाबत नोटीस दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मी आव्हान देतो. माझ्यावर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यामार्फत ५७ कोटी रुपयांच्या विक्रांत घोटाळ्याचा आरोप केला. नील सोमय्यांच्या कंपनीत ४ बिल्डरने मनी लाँड्रिंग केली, असा आरोप केला. आता उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना कागदपत्र आणि खात्यांची माहिती घेऊन पोलिसांकडे पाठवावं.
त्यामुळेच माझ्या पत्नीने त्यांना जाणीवपूर्वक नोटीस दिली. खोटं बोलून विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणाऱ्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यांनी पुढील ४८ तासांत माफी मागितली नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू”, असा इशारा सोमय्या यांनी दिला.