Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

'पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या सांगेन'

'पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या सांगेन'

मुंबई : राज्यभरात होणाऱ्या महाआरतीचा निर्णय रद्द करण्यात आल्याची मनसेकडून अधिकृत घोषणा करण्यात आली असून राज ठाकरे यांनी याबद्दल एक ट्विटही शेअर केला आहे. 'कोणीही उद्या महाआरती करू नका, पुढे काय करायचे ते मी उद्या सांगेन', अशा शब्दात राज ठाकरेंकडून मनसैनिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.


खरेतर, मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाही तर मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. पण उद्या रमजान ईद आहे. कोणाच्याही सणात आपल्याला बाधा आणायची नाही. या हेतून राज्यभर होणाऱ्या महाआरतीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली असून 'आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन.' असेही त्यांनी म्हटले आहे.


https://twitter.com/RajThackeray/status/1521062255722659841
Comments
Add Comment