मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ८ सामन्यांतील पराभवानंतर शनिवारी मुंबईने पहिला विजय नोंदवला. या विजयाने मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता नाही. मात्र या विजयामुळे या मोसमासाठी आणि आगामी हंगामासाठी संघाचे मनोबल नक्कीच उंचावेल.
या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, सुरुवातीला या संघासोबतच खेळायला हवे होते आणि आम्ही असे आहोत आणि असेच खेळू. मुंबई संघाने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी पहिले आठ सामने गमावले आहेत.
मुंबई संघाला त्यांच्या नवव्या सामन्यात पहिला विजय मिळवता आला. “आम्हाला माहीत होते की येथे फलंदाजी करणे सोपे नाही पण आमच्या संघात ज्या प्रकारचे फलंदाज आहेत ते आमच्या बाजूने सामना फिरवू शकतात, असे रोहित म्हणाला.