विलास खानोलकर
पोस्ट सुपरिन्टेन्डन्ट बाबाजी सदोबा हे एक वेळ अक्कलकोटास आले. दर्शन घेऊन चार दिवस राहून ते जावयास निघाले. तेव्हा श्रींची आज्ञा घ्यावी म्हणून हात जोडून मला जाण्यास आज्ञा असावी अशी प्रार्थना केली. किधर जाता है,
बैठो ! असे महाराज म्हणाले. काही वेळाने पुन्हा आज्ञा मागितली. आज्ञा देईनात. आणखी काही वेळ बसून आज्ञा मागू लागले. तो नदी किनारे पार रही असे म्हणाले, पण त्या वेळेस त्याचा अर्थ कोणाला कळला नाही. सुपरिन्टेन्डेन्ट यांस रजा नसल्याने (त्यांनी) असा विचार केला की, आता राहणे उपयोगी नाही. म्हणून दुरुनच पाया पडून महाराजांची नजर चुकवून ते कडपगाव स्टेशनवर गेले. तेथे पोहोचतात, तो पाऊस पडून कृष्णेचा पूल वाहून जाऊन गाडी बंद झालेली होती. त्यांना चार दिवस रखडावे लागले.
पुन्हा पुलाची दुरुस्ती होऊन गाडी सुरु झाल्यावर ते आपल्या गावी गेले. तेव्हा त्यांना श्री स्वामी समर्थांच्या बोलण्याचा अर्थ अनुभवास आला की, आगगाडी नदीच्या पलीकडे राहिली. त्यानंतर ते नेहमीच श्रींच्या दर्शनास येत असत. तात्पर्य, त्रैलोक्यात, सार्या विश्वात काय चालले आहे, हे श्री स्वामी समर्थांना सर्व कळत असे. असे यावरून सिद्ध होते. तूच करता आणि करविता.
तुच करविता आणि ठरविता ।।१।।
शरण तुला भगवंता
शरण तुला रसवंता ।।२।।
आम्र शरीरी तुच रसवितो
श्रीफल शीरी तुच प्रसवितो ।।३।।
गो मातेला दुग्ध प्रसवितो
कोकीळेस मधुरकंठ दावितो ।।४।।
कोकीळ कंठी तुच शोभतो
राघुमैना तुच शिकवितो ।।५।।
चतुरमोरास तुच नाचवितो
मयुर पिसारा तुच खलवितो ।।६।।
वसंत ऋतूस तुच फुलवितो
गुलाबात सुगंध तुच भरीतो ।।७।।
सोन चाफ्यास तुच फुलवितो
सुवर्ण मोगऱयास सुगंध दावितो ।।८।।
सुवर्ण हरिणास तुच नाचवितो
लाल गुलमोहर तुच फुलवितो ।।९।।
नदी नाले तुच भरवितो ।।
पाण झरे सारे खळखळ करवितो ।।१०।।
साऱ्या विश्वाचा श्वास स्वामी
स्वामी कृपेने जगतो आम्ही ।।११।।
अशीच राहो तुझी कृपा
जगात उत्तम ती स्वामी कृपा ।।१२।।