Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

भंडाऱ्यात आयपीएल सट्टेबाजाला अटक

भंडाऱ्यात आयपीएल सट्टेबाजाला अटक

भंडारा : एका रेस्टॉरंटच्या मागे सुरू असलेल्या आयपीएलच्या सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घालत यात रेस्टॉरंट मालकाला मुद्देमालासह अटक करण्यात आल्याची घटना मोहाडी तालुक्यातील करडी येथे घडली आहे. अविनाश केशव बावनकर वय 33 रा. सुभाष वॉर्ड, करडी असे अटक करण्यात आलेल्या रेस्टॉरंट मालकाचे नाव आहे.


अविनाश याचे करडीत अविनाश रेस्टॉरंट असून येथून अविनाश हा तुमसर येथील शेखर उर्फ सोनू अग्रवाल याच्या सांगण्यावरून आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर पैशाची हारजीतची बाजी लावून नागरिकांकडून पैसे घेऊन आकडे उतरवित होता. या गुप्त माहितीवरून भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून छापा घातला असता या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अविनाश बावनकर याच्या ताब्यातून दोन मोबाईल हँडसेट, आयपीएलचे आकडे लिहिलेली पट्टी व साहित्य, रोख 2 हजार 350 रुपये, असा मुद्देमाल ताब्यात घेतला असून अविनाशविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दूसरा आरोपी शेखर उर्फ सोनू अग्रवाल याचा शोध गुन्हे शाखेचे पथक घेत आहे.

Comments
Add Comment