Thursday, July 3, 2025

मोबाइल डाटा चोरून ब्लॅकमेल

मोबाइल डाटा चोरून ब्लॅकमेल

उरण (वार्ताहर) : दिवसेंदिवस पैशांची चणचण जाणवत असल्याने पैसा मिळविण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका टोळीकडून काही क्षणात लोन देण्याचे आमिष दाखवून नंतर लोन घेणाऱ्यांचा मोबाइल डाटा चोरून त्यांचे अश्लील फोटो एडिट करून ब्लॅकमेल करून लूट केली जात आहे.


याचा त्रास उरणमधील काहींना झाला असून ते भीतीपोटी या आमिषाला बळी पडले आहेत. अशा मोबाइलवर येणाऱ्या फसव्या लोन अथवा इतर अॅपपासून जनतेने सावधान राहावे. पोलिसांनी अशा ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment