
मुंबई : मनसेने उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरतीचे आयोजन केले होते. त्यासंबंधित आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर आता अचानक मनसेकडून हा महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
उद्या रमजान ईद या मुस्लिमांच्या सणात व्यत्यय येऊ नये म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मनसेचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे.