Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीएसी लोकलपाठोपाठ फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात

एसी लोकलपाठोपाठ फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात

मुंबई : अवघ्या काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या दरामध्ये कपात केली असताना. रेल्वेने फर्स्ट क्लासच्या तिकीट दरामध्येही कपात करून मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. आज रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी. के. तिवारी यांनी मुंबईत यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या दरात कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. फर्स्ट क्लासच्या मासिक पासचे दर जैसे थे राहणार आहेत. सध्या फर्स्ट क्लासचे ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचे तिकीट १४० रुपये असून मासिक पासची किंमत ७५५ रुपये इतकी आहे. रेल्वेच्या तिकीट दरामधील कपातीच्या मोठ्या निर्णयानंतर १४० रुपयांचे तिकीट आता ८५ रुपयांपर्यत म्हणजे सुमारे ५० टक्के कमी होणार आहे.

एसी लोकलच्या भाड्यातही ५० टक्के कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ही मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता एसी लोकलमधून पाच किलोमीटरचा प्रवास ६५ ऐवजी आता केवळ ३० रुपयांमध्ये करता येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -