Tuesday, March 18, 2025
Homeमहामुंबईविनाशेड मासळी बाजारामुळे ऑनलाइन ऑर्डरला पसंती

विनाशेड मासळी बाजारामुळे ऑनलाइन ऑर्डरला पसंती

उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे संपूर्ण दिवस घरामध्ये लॉकडाऊन

मुंबई (प्रतिनिधी) : भारतात उष्णतेची लाट ही सामान्य बाब आहे. दर वर्षी मार्च -जूनदरम्यान भारतात तापमानवाढ दिसून येते; परंतु या वर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा बसण्यास सुरू झाल्या आहेत. यंदाचा एप्रिल महिना उन्हाच्या बाबतीत विक्रमी ठरला. गेल्या १२२ वर्षांमधील तापमानाचा उच्चांक यंदाच्या वर्षी देशाने गाठला. अजून एक ते दीड महिना आपल्याला पावसाची प्रतीक्षा करावयाची आहे. यातच अशा उन्हामध्ये जर बाहेर जायचे झाले, तर आजारपण आणि मग हॉस्पिटलचा अतिरिक्त खर्च या समस्या अनेक नागरिकांना येतात.

सध्याच्या वाढत्या तापमानामुळे मांसाहारी खवय्यांनी आता ऑनलाइन ऑर्डरला पसंती देत असल्याचे यमीलि या कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. वाढलेल्या तापमानामुळे ताजे मासे बाजारात जाऊन आणणे हे सध्यातरी फारच जिकरीचे झाले आहे. कारण, मुंबई व लगतच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी मासळी बाजार हा विनाशेडचा असतो त्यामुळे उन्हामध्ये उभे राहावे लागते व याचा त्रास अनेक नागरिकांना होतो. याविषयी अधिक माहिती देताना ताजे मासे, मटण, चिकन घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या यमीलि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद बांदेकर सांगतात, “एप्रिल महिन्यामध्ये आमच्या विक्रीमध्ये खासकरून ताज्या माशांच्या विक्रीत कमालीची वाढ झाली आहे.

मासे खरेदी करणे हि एक कला आहे; परंतु वाढत्या तापमानामुळे अनेक नागरिक बाहेर पडत नाहीत. कारण, उन्हामुळे विविध आजारांची लागण होण्याची शक्यता असते व यासाठीच आम्ही बाजारात मिळणाऱ्या किमतीमध्येच मुंबई, नवी मुंबई ठाणे येथे ताजे मासे, अंडी, चिकन, मटण याची घरपोच डिलिव्हरी करतो. आमच्याकडील मासे तसेच चिकन मटण हे फ्रोझन नसतात, तर ते त्याच दिवशी सकाळी बाजारातून आणले जातात तसेच आमच्याकडे असलेल्या स्टाफद्वारे ते स्वच्छ करून कापले जातात व ग्राहकांकडे पोहोचविले जातात.

सध्याचे तापमान पाहता नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, अशी विनंती शासनातर्फे करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या सुविधांसाठी सुरु केलेल्या या व्यवसायाला वाढलेल्या तापमानामुळे एक चांगली दिशा मिळाली आहे. उन्हामुळे दिवसाचे अघोषित लॉकडाउन सुरू झाले आहे, विशेषकरून ज्येष्ठ नागरिक, मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांना या वाढत्या तापमानाचा खूप त्रास होतो म्हणूनच अनेक नागरिक ऑनलाइन मासे मागवत आहेत.”

आज संपूर्ण भारतात ऑनलाइन फूडची मागणी दिवसागणिक वाढत चालली आहे. वर्क फ्रॉम होम तसेच कोरोना महामारीनंतर वाढलेल्या कामाच्या वाढलेल्या “एक्सट्रा हवर्स”मुळे अनेकांना इच्छा असूनही मासे – चिकन आणण्यास वेळ मिळत नाही, अशा कुटुंबासाठी यमीलि घरपोच डिलिव्हरी करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -