नवी दिल्ली : भारतात कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने होत असून देशात कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ६८८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी ३ हजार ३७७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि ६० जणांचा मृत्यू झाला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 2755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 803 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 22 हजार 377 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 188 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात देशात 22 लाख 58 हजार 59 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 188 कोटी 89 लाख 90 हजार 935 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.