अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद येथील सभेला परवानगी मिळाली असली तरी काही अटी – शर्तींची मर्यादा आखून देण्यात आली आहे. अशातच राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
हा अपघात अहमदनगरच्या पुढे घोडेगाव जवळ झाला असून या अपघातात ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या. त्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक केदार शिंदे आणि कलाकार अंकुश चौधरी यांच्या गाड्याचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातातील जखमींची माहिती अद्याप समोर आलेली नाही.