Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीवर्सोवा समुद्र किनारी गोणीत आढळला महिलेचा मृतदेह

वर्सोवा समुद्र किनारी गोणीत आढळला महिलेचा मृतदेह

मुंबई : मुंबईच्या वर्सोवा येथील समुद्र किनारी एका गोणीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. साधारण: २५ ते ३० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. गोणीतील महिलेच्या गळ्याला शरीराचे इतर भाग बांधण्यात आले होते.

वर्सोवा येथील समुद्र किनारी एका गोणीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी अधिकचा तपास सुरु केला होता. आता त्या महिलेची ओळख पटली असून महिलेची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने तो समुद्र किनारी आणला असल्याचा अंदाज पोलिसांना आहे.

दरम्यान, पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -