Saturday, September 13, 2025

ठाण्यात १ मे रोजी वॉकेथॉनचे आयोजन

ठाण्यात १ मे रोजी वॉकेथॉनचे आयोजन

ठाणे : इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्थेशिओलॉजिस्टच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार १ मे २०२२ रोजी उपवन तलाव येथे वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ७ वाजता निरोगी आयुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक व्यायाम प्रकारातील झुंबा या नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण ठाणे शाखेने आयोजित केले आहे. सकाळी ७.३० वाजता कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे आणि मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ७.३० ते ८.३० यावेळेत वॉकेथॉन संपन्न होणार आहे. सर्वांसाठी आवश्यक असणारी COLS (जीवनसंजीवनी) ची प्रात्यक्षिके सर्व भूल तज्ञ सर्वसामान्यांना दाखविणार आहेत.

तरी इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्थेशिओलॉजिस्टच्या ठाणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. मीनल गाडगीळ आणि सचिव डॉ. मनीषा घोष यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment