Monday, March 17, 2025
Homeमहामुंबईतुरुंगात घरचे जेवण मिळण्यासाठी राणा दाम्पत्याचा अर्ज

तुरुंगात घरचे जेवण मिळण्यासाठी राणा दाम्पत्याचा अर्ज

मुंबई (प्रतिनिधी) : तुरुंगात घरचे जेवण मिळावे यासाठी राणा दाम्पत्यांने अर्ज केला आहे. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहेत. राणा दाम्पत्य राजद्रोहाच्या आरोपाखाली सध्या कोठडीत आहे.

आज (शुक्रवारी) राणांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी कोठडीत घरचे जेवण मिळावे, अशी मागणी राणांनी अर्जाद्वारे केली आहे. राणा दाम्पत्याला वांद्रे कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. त्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने अॅड. प्रदीप घरत बाजू मांडतील तर अॅड. रिझवान मर्चट राणा दाम्पत्याची बाजू मांडतील. आहे. तत्पूर्वी, राणा दाम्पत्याने घरचं जेवण मिळावं म्हणून अर्ज केला आहे.

राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आलेला राजद्रोहाचा एफआयआर रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, मुंबई हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळली. नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली होती. त्यांनंतर राणा दाम्पत्याला रविवारी वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राणा दाम्पत्याने यानंतर मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, प्रक्षोभक वक्तव्य यासंदर्भात गुन्हे दाखल केले आहेत.

राणा दाम्पत्याकडून तक्रार

राणा दाम्पत्याविरोधात खार पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा नोंद केल्यानंतर आक्रमक झालेल्या राणांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार केली आहे. त्याचबरोबर परिवहन मंत्री अनिल परब आणि शेकडो शिवसैनिकांविरोधातही राणांनी तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी शिवसैनिकांना चिथावल्याचा आरोप या तक्रारीतून राणांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -