Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यात भिंती झाल्या बोलक्या

ठाण्यात भिंती झाल्या बोलक्या

ठाणे : ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागा तर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत आयोजित शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांच्या बाहेरील दर्शनी भिंतीवर चित्रे व स्वच्छतेचे संदेश लिहून नागरीकांमध्ये जनजागृती करण्याचे काम. कला क्षेत्रातील प्रसिद्ध स्केचो अॅक्टीवीटी सेंटर या संस्थेमार्फत होत असून स्केचो अॅक्टीवीटी सेंटरच्या प्रमुख युवा मूर्तिकार चित्रकार आरती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या २० कलाकार टीमने ठाणे शहरात सुशोभीकरण कलेच्या आगळ्यावेगळ्या कल्पना राबविल्या आहेत.

या निमित्ताने ठाण्यातील चित्रकार सिद्धार्थ नांगरे, अजित कदम, सागर शिंदे, संभू दलाई, किशोर सावंत, सचिन जाडे, समीर पेंडुरकर, दिनेश कदम, नंदिता कासले, पूजा तुराटे, शबाना मिर्झा, किशोर सावंत, वेदांत सावंत, क्रिशन साळवे, लालचंद भिंड, बाबासाहेब गायकवाड, निखिल साळुंके, संजीत पवार, ओमकार वेजरे, नितीन मोतुपल्ले, ललित चव्हाण, मंगल रगडे या २० तरुण चित्रकारांच्या कलाकृतींचे सामूहिक कला दर्शन भिंतीवर रंगवलेले दिसत आहे.

ठाणे शहर स्वच्छ व सौंदर्यवेधी व्हावे म्हणून ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागा तर्फे प्रत्येक प्रभागात सौंदर्यीकरणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या आहेत, इथे प्रत्येक भिंत बोलते आहे आणि देते आहे स्वच्छ पर्यावरण संदेश. सांस्कृतिक संस्कृतीपासून ते अत्याधुनिक प्रगतीपर्यंतचे विविध कलाप्रकारानी या भिंती बोलक्या झाल्या आहेत. पारंपरिक भिंत व रंगलेल्या भिंतीमुळे ठाणे शहराचा भिंतीचे रूपच पालटले या अभियानास नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे,जेष्ठ नागरीक कौतुक करून आम्हाला प्रोत्साहन देतात, ‘पब्लिक आर्ट’ निमित्तानं सामान्य माणूस चित्रांचा विचार कसा करतो याचा अभ्यास आम्हाला होऊ लागला आहे. ठाणेकर आमची चित्रे पाहताना चित्रकार म्हणून आनंद होतो ठाणेकरांनी रसिक होणं याचं महत्त्व निर्विवाद वेगळं आहे. या निमित्ताने आम्हा कलाकारांना, चित्रकारांना ठाणे महानगर पालिकेने संधी दिली व्यासपीठ दिले असे युवा मूर्तिकार चित्रकार आरती शर्मा यांनी म्हटले आहे.

आरती शर्मा यांच्या मार्गदर्शना खाली चित्रकारांनी प्रोटेट रंग वापरून निसर्ग चित्र , आदिवासी वारली, वास्तववादी व अमूर्त शैलीतील विविध चित्राकृतींचा अनोखा आविष्कार केला आहे या भिंतीवर आपल्या कलाकुसरीतून, समाजजीवनाचा अनमोल ठसा चित्रकारांनी उमटवला आहे. या भिंती सध्या ठाणेकर रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अधिक माहितीसाठी ९३७२२२३६११ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -