Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीपुण्यात महिनाभरात चौथ्यांदा सीएनजी महागला

पुण्यात महिनाभरात चौथ्यांदा सीएनजी महागला

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पुण्यात सीएनजी दरात प्रती किलो २ रुपयांची वाढ केली आहे. पुण्यात सीएनजीचा दर ७७.२० रुपये इतका वाढला आहे. एप्रिल महिन्यात तब्बल चौथ्यांदा सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली. सीएनजी १५ रुपयांनी महागला असून वाहनधारक आणि रिक्षा व्यावसायिकांना फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईत मात्र सीएनजी- पीएनजी दर स्थिर आहेत.

‘एमएनजीएल’ च्या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी सीएनजीचा एक किलोचा दर ७७.२९ रुपये इतका आहे. घरगुती वापराच्या पीएनजीचा दर ४४.७० रुपये स्टॅंडर्ड क्युबिक मीटर इतका आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत गॅस वितरक कंपन्यांकडून सीएनजी आणि पीएनजी दरात वाढ केली जात आहे.

पुण्यात एक एप्रिल २०२२ रोजी सीएनजी ६२.२० रुपये आणि पीएनजी ३३.७० रुपये दर होता. त्यात वाढ होऊन तो ६८ रुपये इतका झाला. त्यात आणखी ५ रुपयांची वाढ करण्यात आली होती आणि एक किलोचा दर ७३ रुपये इतका वाढला होता. तिसऱ्यांदा सीएनजी दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली होती आणि सीएनजी दर ७५ रुपयांवर गेला होता. आज २८ एप्रिल २०२२ च्या मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असल्याचे कंपनीनं म्हटलं आहे.राज्य सरकारने अर्थसंकल्पात ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’च्या दरावर (सीएनजी) आकारला जाणारा कर (व्हॅट) १० टक्क्यांनी कमी केला होता. त्यानंतर पुण्यात सीएनजी सहा रुपये तीस पैसे आणि ‘पाइप नॅचरल गॅस’ (पीएनजी) ३.४० रुपयाने स्वस्त झाला होता.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांत ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’चा पुरवठा केला जातो. ‘एमएनजीएल’चे पुणे परिसरात १०८ सीएनजी पंप आहेत. मुंबईत महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा केला जातो. मुंबईत एक किलो सीएनजीचा दर ७२ रुपये इतका आहे. ‘पीएनजी’साठी ४५.५० रुपये इतका दर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -