मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवतरली ‘चंद्रमुखी’

Share

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी एकदम गजबजून गेले होते. सर्वत्र ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल घुमत होते. या उत्साही वातावरणात या विमानतळावर लावण्यवती ”चंद्रमुखी” अवतरली होती. आपल्या साजशृंगार, मोहमयी नजाकती, अदांनी ”चंद्रा”ने उपस्थितांना घायाळ केले. यावेळी ”चंद्रा”ने सादर केलेल्या या नृत्यात हवाईसुंदरींनीही ठेका धरला. मराठी सिनेसृष्टीत एखाद्या चित्रपटाला अशा प्रकारे प्रसिद्धी देण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. स्पाईसजेटच्या विमानावर यावेळी ‘चंद्रमुखी’चे पोस्टरही झळकले.

सध्या सर्वत्र प्रसाद ओक दिग्दर्शित ”चंद्रमुखी”चीच हवा आहे. जिथे पाहावे तिथे ”चंद्रा” अवतरत आहे. पुण्यातील मेट्रोमध्ये प्रवाशांना आपल्या सूरतालात दंगवल्यानंतर आता ”चंद्रा”ने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपला जलवा सादर केला. या दरम्यान ”चंद्रा” म्हणजेच अमृता खानविलकर आणि ”दौलतराव देशमाने” म्हणजेच आदिनाथ कोठारे यांनी २९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा ”चंद्रमुखी” सर्व प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा, असे आवाहनही केले.

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कंपनी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्यासह मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, अशोक शिंदे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अन्य प्रमुख कलाकार आहेत.

Recent Posts

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

30 minutes ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

1 hour ago

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

7 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

7 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

8 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

8 hours ago