एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात

Share

मुंबई : वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात करत असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. विविध स्तरातील लोकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेत असल्याचे रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी म्हटले आहे. त्यांनी आज भायखळा रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ऐन उन्हाळ्यात सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेने एसी लोकल सुरू केली. पण, एसी लोकलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार वारंवार प्रवाशांकडून केली जात होती. त्यामुळे एसी लोकलला प्रतिसाद देखील मिळत नव्हता. ‘वातानुकूलित रेल्वेच्या तिकीट दरात किती कपात करायला हवी, असे आम्ही वेगवेगळ्या स्तरातील लोकांना विचारत होतो. त्यावर कोणी म्हणत होते ३० टक्क्यांनी दर कमी करा, तर कोणी म्हणत होते २० टक्क्यांनी दर कमी करा. मात्र देशाचे पंतप्रधान हे नेहमी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत असतात. त्यामुळे आम्हीही सामान्य माणसासाठी निर्णय घेत वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात करत आहोत,’ असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

‘याआधी २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी मुंबईकरांना १३५ रुपये मोजावे लागत होते. मात्र तिकिटाची ही रक्कम यापुढे ६५ रुपये इतकी असणार आहे. तसेच ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करणाऱ्यांकडून याआधी २०५ रुपये तिकीट आकारले जात होते, हे भाडे आता १०० रुपये इतके असणार आहे,’ अशी माहिती दानवे यांनी दिली.

यामुळे सीएसएसटी ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या एसी लोकलमधील प्रवासाला एका तिकीटासाठी १३० रुपये मोजावे लागायचे तिथे आता ९० रुपये आकारले जाणार आहे. तर चर्चगेट ते वसई रोड या ५२ किलोमीटरच्या प्रवासाला २१० रुपये द्यावे लागायचे तिथे आता १०५ रुपये द्यावे लागणार आहेत.


किलोमीटर                   सध्याचे दर                               सुधारीत दर


५                                 ६५                                    ३०


२५                                 १३५                                  ६५


५०                                २०५                                   १००


१००                               २९०                                   १४५


१३०                                 ३७०                                 १८५


 

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

6 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

7 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

8 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

8 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

9 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

9 hours ago