ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात वयोवृद्ध नागरिकांना लस घेण्यात रस नसून लसीकरनाचे वावडे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येत आहे. केवळ २२ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी दोल डोस घेतल तर ४ टक्के ज्येष्ठांनी बुस्टर डोस घेतले आहेत. कोरोना विषाणूच्या चौथ्या लाटेची चर्चा सुरु असतानाच ठाण्यातील लसीकरण मोहिमेच्या आढाव्यात ठाणे जिल्ह्यातील केवळ २३ टक्के जेष्ठ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. तर त्यापैकी ४ टक्के जेष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे प्रमाण असमाधानकारक आहे.
शासनाने करोनाविषयक निर्बंध शिथिल केले असून ठाणे जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोनाचे अतिशय कमी रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत नाहीत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने कमी झाल्याने नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. यामध्ये जेष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त असून, प्रशासनाकडे लशींचा अतिरिक्त साठा असूनही जेष्ठ नागरिकच लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यातील १२ ते १४ वयोगटातील ३६.५१ टक्के मुलांना लसीचा पहिला डोस तर ८.४१ टक्के मुलांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. १५ ते १७ वयोगटातील ६०.६० टक्के किशोरवयीन मुलांना लसीचा पहिला तर ४५.४७ टक्के किशोरवयीन मुलांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटातील ९०.७५ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला तर ८०.६३ टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ४५ ते ५९ वयोगटातील ४८.३६ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला तर ४४.१६ टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
६० वर्षांवरील २५.६६ टक्के जेष्ठ नागरिकांनी लसीचा पहिला तर २२.९४ टक्के जेष्ठ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तर ४.४७ टक्के जेष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी १५ लाख नागरिकांनी कोव्हीशील्डचे तर कोवॅक्सिनचे १५ लाख ५५ हजार आणि स्पुटनिक व्ही लसीचे ५६ हजार डोस दिले गेले आहेत. तर कॉर्बोवक्स लसीचे १ लाख ४४ हजार डोस दिले गेले आहेत.